मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.
यहेज्केल 22:30.
औरंगाबाद शहराच्या तटाच्या खिंडीत उभे राहणारे लोक देव आज शोधत आहे.
शहरात प्रार्थना गट आहेत परंतू त्यात प्रार्थना कमी वाटतात.. परमेश्वराच्या नावाने अनेक विश्वासणारे मध्यस्थी प्रार्थना करणारे अनेक हाथ उभे राहीले पाहीजेत.
आणि आज अनेक शहरामध्ये फेलोशीप आहेत परंतू त्यात अधीक प्रार्थना उपास होणे गरजेचे आहे.
सिनीअर मंडळी शहरासाठी काही घेणे न देणे असे आविर्वाभावात हात वर करून उभे आहेत.
आपण कोणाच्या पाठीमागे जात आहोत याचा जास्त विचार करण्याची गरज आहे देवाच्या कि माणसांना दाखवण्यासाठी पुढाऱ्यांच्या.
देवाला खिंडीत उभा राहून मध्यस्थी करणाऱ्या लोकांची गरज आहे.शहर आपले आहे प्रत्येकाचे आहे॥।। आम्ही सर्व सेवकांनी जबाबदारी न झटकता शहरासाठी मनापासून प्रार्थना करणे गरजेचे आहे. आणि या प्रार्थनेमुळे निश्चित संजिवन येईल.
हे परमेश्वरा आम्हाला साह्हाय कर कि आम्ही अनेक हरवलेल्या आत्म्यासाठी आम्ही मध्यस्थी प्रार्थना करावी व देवाच्या राज्य बांधावे धन्यवाद येशू आमेन.